Sunday, 25 December 2016

आकडेबाज मिशावाला


          अहो, मी नुसतं ओळखीच्याच नाही, तर अनोळखी लोकांचेही कौतुक करतो. बिनधास्त!! सहज एक गंमत आठवली ती सांगतो. एकदा मी लोकलट्रेनने प्रवास करीत होतो. गाडीत अगदी तुरळक गर्दी होती. माझ्या समोरच्या सीटवर एक पंचविशीचा तरुण आपल्या मित्राबरोबर बसला होता. त्या तरुणाच्या मिशा देशभक्त 'चन्द्रशेखर आझाद'च्या फोटोत दाखवतात ना, अगदी तशा किंवा जुन्या चित्रपटात फेटा बांधलेल्या गावच्या पाटलाच्या दाखवतात ना, अगदी तशा आकडे काढलेल्या होत्या. जो तो त्याच्या मिशांकडे चोरून चोरून पहात होता. मी सुद्धा बराच वेळ त्याच्याकडे पहात होतो. माझं उतरायचं स्टेशन आलं. मी उठून दरवाजात जाऊन उभा राहीलो. पण मला त्याच्या मिशा आणि त्याचा रुबाब एव्हढा आवडला होता, कि मला काही राहवलं नाही. मी हात हलवून त्याचे लक्ष माझ्याकडे वेधले. पैलवान आपल्या मिशांवर फिरवतात, तशी हाताची उलटी मूठ माझ्या मिशांवर फिरवून त्याला दाखवली. मग त्याच्या मिशांकडे बोट दाखवून, त्याला आपण हाताने 'छान! छान!' चा इशारा करतो ना, तस्सा तर्जनी आणि अंगठ्याचा गोल करून, बाकी तीन बोटे उभे ठेऊन त्याला नाचवून दाखवली. त्याला कळले कि मी हाताच्या इशाऱ्याने त्याच्या मिशांचे कौतुक करतोय ते!! इतका काही लाजला ना म्हणता तो!! कि यंव रे यंव!!!

2 comments:

 1. कथेच्या title प्रमाणे कथा interesting नाही वाटली.

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार. आपणांस शीर्षकाएवढी कथा आकर्षक वाटली नाही ह्याबद्दल क्षमस्व. कदाचित हा माझ्या लिखाणाचा दोष असू शकतो. खरे तर हि कथा नसून माझा स्वानुभव आहे. त्यामधील 'तरुणाच्या मिशा' ह्या 'आकडे' काढलेल्या अशा होत्या. म्हणून मी लेखाला 'आकडेबाज मिशावाला' असे शीर्षक दिले आहे.

   तरी आपण एखादे समर्पक शीर्षक सुचविलेत तर शीर्षक बदलण्याविषयी मी नक्कीच विचार करेन.
   पुन्हा एकदा आपले आभार.

   Delete