Sunday, 25 December 2016

एखाद्याचे आपण कौतुक का करावे?         मी तर म्हणेन एखाद्याचे कौतुक का करू नये? जरका दुसऱ्याचे कौतुक केल्याने आपलाच फायदा होत असेल, तर एखाद्याचे कौतुक जरूर करावे. आता तुम्ही म्हणाल यात कसला आलाय फायदा? उलट नुकसानच दिसतंय.

          बरोबर आहे. वरकरणी आपल्याला यात नुकसानच दिसतं. पण जेव्हा तुम्ही मनापासून कोणाचे तरी कौतुक कराल तेव्हा आपल्या मनात होणाऱ्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला जाणवेल कि, कोणाचेहि कौतुक करताना आपले मन भरून येत असतं. आपलं मन उचंबळुन येत असतं. आपल्या मनात गोड लहरी उठू लागतात. मनाच्या एका वेगळ्याच हव्या हव्याश्या भावनेत आपण तरंगायला लागतो. काय सांगू , किती सांगू , किती बोलू असं होऊन जातं.

          कोणाचंहि कौतुक केल्यावर आपल्याला असं वाटतं, जसं एखादे सृष्टीसौन्दर्य पाहिल्यावर वाटतं. जसं आपल्या प्रियजनांची भेट झाल्यावर वाटतं. जसं आकाशातले विविध रंग बघितल्यावर वाटतं. जसं गाढ झोपी गेलेल्या बाळाला झोपेत खुद्कन हसताना पाहिल्यावर वाटतं. जसा मुसळधार पाऊस कोसळताना पाहून वाटतं. जसं कुठल्याही पक्ष्याच्या पिल्लाला गोंजारताना वाटतं.

          अगदी तसंच आणि त्याहीपेक्षा अजून जास्त गोड गोड काहीतरी वेगळंच वाटतं. आणि हि मनाची नशा जो कोणी अनुभवतो, तो ह्या नशेचा गुलाम होऊन जातो. आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो कोणाचे तरी कौतुक करून ह्या नशेचं रसपान करू पहातो.
 
          मग सांगा दुसऱ्याचं कौतुक करण्यात फायदा कोणाचा आहे? आपलाच ना!!!?

2 comments:

 1. hello sir ya article madhe fakta stri cha udharan peksha lahaan balaach udharan dila asta tar bara jhala asta over all its nice
  no offence .... gr8 going (y)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद पंकज, अगदी अचूक सांगितलंत. आपल्या प्रतिक्रियेचे नेहमी स्वागतच आहे. आपल्या सूचनेनुसार लेखात योग्य तो बदल केला आहे. या पुढेही आमच्यावर आपले असेच लक्ष असू द्यावे हि विनंती.

   Delete