Wednesday, 18 October 2017

लाचार, बेबस कुत्रा आणि मी!!मुंबईच्या लोकल प्रवाश्यांच्या परिस्थितीशी किती अचूक जुळतोय ना हा फोटो!

फोटोतल्या त्या कुत्र्याचा चेहरा पहा ना, किती लाचार आणि बेबस झालेला दिसतोय बिचारा. अगदी माझ्यासारखा!!!


मीसुद्धा गेली २८ वर्षे लोकल प्रवास करतोय. सहन होत नाहीये, आणि सांगताही येत नाहीये.

माझ्या बोलण्याची तीव्रता समजायला एक घटना सांगतो. एकदा भर गर्दीच्यावेळी मी लोकलमध्ये वरच्या कुत्र्यासारखा कळकट मळकट लोकांमध्ये चारीबाजूने दबला गेलो होतो. माझ्या समोरच्या उंच आणि जाड्या माणसाचा पार्श्वभाग माझ्या पोटावर जोऱ्याचा दाबला जात होता. आणि त्या उंच आणि जाड्या माणसाने परपर परपर करून एक मोठ्ठा अपानवायू माझ्या पोटावर सोडला. त्याचे vibration एवढे जोऱ्याचे माझ्या पोटापर्यंत पोहोचले, की माझ्या पोटातलं अक्षरशः सगळं ढवळून वर आलं.  मीसुद्धा त्यावेळी वरील कुत्र्यासारखाच लाचार आणि बेबस झालो होतो.

No comments:

Post a Comment