Friday, 13 January 2017

आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले.


                 तो दिवस मला अजून आठवतोय जेव्हा मला 'अंकल'चे प्रमोशन मिळाले होते. मी २४-२५ वर्षांचा असतेवेळी एकदा एका केमिस्टच्या दुकानात औषधे घ्यायला गेलो होतो. काउंटरवर एक १६-१७ वर्षाचा मुलगा उभा होता. पैसे परत देताना तो मला "अंकल, यह ले लो आपका पैसा" असं म्हणाला. त्यावर त्याने 'अंकल' म्हटल्याचा मला इतका भयंकर राग आला कि मी त्याच्यावर जोरात खेकसलो. "क्या मैं तुझे अंकल दिखता हूँ क्या?" वास्तविक तोपर्यंत मला कोणीही 'अंकल' म्हटले नव्हते. मला वाटलं तो मुद्दामहून माझी टिंगल करण्याकरीताच मला 'अंकल' म्हणतोय. तो एवढा भेदरला होता कि नाही!! पण थोड्याच दिवसांत सगळेच मला 'अंकल' म्हणू लागले. आणि मग मला जाणवले कि मी आता खरोखरच 'अंकल' दिसायला लागलोय. तो मुलगा मला 'अंकल' म्हणाला होता ते बरोबरच होते. मी उगाच त्याच्यावर रागावलो होतो. आणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले. न स्वीकारून करतो काय?

4 comments:

 1. त्यात वाईट वाटण्यासारखे किंवा राग येण्यासारखे नसावे..😇 त्याने आदराने तुम्हाला "अंकल" म्हणून संबोधले असणार... शेवटी तुम्हाला काय अपेक्षित होते?😂

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!

   माझे 'अंकलचे' वय झालेले असूनही अजाणतेपणी मी स्वतःला एक कोवळा तरुणच समजत होतो. याची जाणीव त्या तरुणाने माझ्या बेसावधपणी अचानक मला करून दिल्याने साहजिकच माझी पहिली प्रतिक्रिया हि रागाचीच आलेली. पण सत्य स्वीकारल्यानंतर माझ्या वागण्याचे मला नंतर वाईटही वाटले.

   Delete
 2. Me tar abhimanane maze vay sangte. Mala khoop avdte ulat koni lahan mulani mavshi, kaki , aunty bolalele.

  ReplyDelete
  Replies
  1. @ रश्मी, माझा लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आपले आभार.
   आपके जिंदादिलीको हमारा सलाम! आपण माझ्या लेखाशी रिलेट झालात याचा मला आनंद वाटतोय.

   Delete